नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता 2000 रूपये खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार

महाराष्ट्रातील लाखो कष्टकरी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेच्या २२ व्या हप्त्यानंतर, आता राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या ८ व्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी नुकतीच देण्यात आलेली आहे.

८वा हप्ता 2000 रूपये: कोणाला आणि किती लाभ मिळणार?

राज्य शासनाने या हप्त्यासाठी सुमारे १,७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, याचा लाभ राज्यातील ९० लाख ३४ हजार पात्र शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती नुकतीच प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे.

  • हप्त्याची रक्कम: पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा करण्यात येणार आहेत.
  • कालावधी: हा हप्ता ऑगस्ट २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी देण्यात येणा आहे.
  • एकूण वार्षिक मदत: केंद्र सरकारचे ६,००० आणि राज्य सरकारचे ६,००० असे एकूण १२,००० रुपये वार्षिक मदत शेतकऱ्यांना मिळत आहेत.

पैसे खात्यात कधी जमा होणार आहे? (Update)

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ८ व्या हप्त्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली आहेत.

  • संभाव्य तारीख: येत्या आठवड्याभरात (मार्चच्या शेवटच्या आठवड्यात) हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
  • थेट लाभ: ही रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहेत.

नमो शेतकरी योजनेचे स्टेटस ‘ऑनलाइन’ कसे तपासायचे?

तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही, हे पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करायचे आहे: १. नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलला किंवा ‘पीएम किसान’च्या वेबसाइटला भेट द्यावी आणि. २. ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. ३. तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचे आहेत. ४. कॅप्चा कोड भरून ‘Get Data’ वर क्लिक करायचे आहे. ५. येथे तुम्हाला ८ व्या हप्त्याचे स्टेटस (उदा. Waiting for approval किंवा Payment Processed) दिसेल.

हप्ता अडकला असल्यास ‘हे’ लगेच करा

जर तुम्हाला मागील हप्ते मिळाले असतील पण ८वा हप्ता येण्यास अडचण येत असेल, तर खालील गोष्टी चेक करा:

  • e-KYC: तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करावी.
  • Aadhar Bank Seeding: तुमचे बँक खाते आधारशी लिंक (NPCI Mapping) असणे अनिवार्य आहेत.
  • Land Seeding: तुमच्या अर्जात जमिनीची नोंद ‘Yes’ आहे का ते तपासायचे आहे.

निष्कर्ष

नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांना खरीप पूर्व मशागत आणि इतर शेती कामांसाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहेत. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आपले बँक खाते आणि केवायसी अपडेट ठेवणे गरजेचे आहेत.

Leave a Comment